कुंभोज परिसरात क्षमतेपेक्षा जादा प्रवासी घेऊन लालपरीचा जीवघेणा प्रवास

कुंभोज  (विनोद शिंगे)

कुंभोज (ता.हातकणगले)येथे लालपरीची प्रवासी वाहतूक सध्या चर्चेचा विषय होत असून लालपरीतुन नेमकी प्रवासी वाहतुक संख्या किती आहे असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांनी निर्माण झाला असून, एका एका लालपरी बस मधून शंभर पेक्षा जास्त प्रवासी सध्या प्रवास करत असल्याचे चित्र कुंभोज परिसरात दिसत आहे.

 

 

 

कुंभोज परीसरातून दररोज इचलकरंजी पेठ वडगाव व कोल्हापूर अशा ठिकाणी शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करतात. लाल परीतून मोठ्या प्रमाणात महिला पुरुष प्रवास करतात कुंभोज परिसरात सध्या एस टिची कमी असणारी संख्या व प्रवाशांची होणारी ज्यादा वाहतूक यामुळे एसटी अथवा लाल परीतुन शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी व प्रवासी एकावेळी प्रवास करत असल्याचे चित्र दिसत असून एखाद्यावेळी एखादी वाईट घटना घडल्यास जबाबदार कोण?
एसटी महामंडळाच्या नियमाप्रमाणे 50 पेक्षा जास्त प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली जात नाही. परंतु सध्या ग्रामीण भागात हे चित्र उलटे दिसत असून शंभर पेक्षा जास्त प्रवासी एकावेळी एसटीतून प्रवास करत असल्याचे चित्र दिसत आहे .शासनाने महिलांना निम्मे तिकीट व 70 वर्षीय सर्वांनाच मोफत प्रवासाची सुविधा केल्याने मोठ्या प्रमाणात महिलावर्ग सध्या एसटी म्हणजेच लालपरीतून प्रवास करत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी एसटी महामंडळाने कुंभोज परिसरात एसटींची संख्या वाढवावी अथवा ज्या एसटी बसेस प्रवासासाठी येतात त्यांना नियमावली घालून द्यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांत सध्या होत आहे.