कुंभोज (विनोद शिंगे)
एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली येथे शुक्रवार १७ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता इयत्ता आठवी व नववीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व समुपदेशन हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थिती प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून दीपक खोत सर समुपदेशक, रूकडी हे होते.
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी मंगलाचरण सादर केले.
स्वागत प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे यांनी केले तर प्रास्ताविकेमध्ये करिअर किती महत्त्वाचे आहे हे सांगितले त्यानंतर अतिथी परिचय प्रशालेच्या अध्यापिका अश्विनी देमाण्णा यांनी करून दिला, तसेच प्रमुख पाहुण्यांचा सन्मान प्रशालाचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे यांनी सरांचा सन्मान केला.
प्रमुख मनोगतामध्ये दीपक खोत सर यांनी करिअर का महत्त्वाचे आहे, तसेच आपल्यामध्ये जे कौशल्य आहे ते विकसित करणे गरजेचे आहे, या वयामध्येच आपण आपले ध्येय ठरवून त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, असे त्यांनी अनेक छोट्या मोठ्या उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई तसेच तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई हे होते.
आभार सुदर्शन चौगुले यांनी केले. या कार्यक्रमासाठी इयत्ता आठवी व नववीचे सर्व वर्गाध्यापक,विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी सूत्रसंचालन आशितोष व्हनवाडे व प्रिया कुरुंदवाडे यांनी केले.