अर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावा

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाचा (स्वायत्त) माजी विद्यार्थी मेळावा नुकताच उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

 

 

 

डॉ. सुभाष कोंबडे यांनी, जुन्या आठवणींना उजाळा देण्याबरोबरच माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क तयार करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले विद्यापीठातील आपले अनुभव आणि आपल्या जीवनातील अधिविभागाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अधिविभागाचे प्रमुख डॉ. महादेव देशमुख यांनी अधिविभागाच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. डॉ. डी. आर. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. डी. आर. ननवरे यांनी आभार मानले.

🤙 8080365706