निर्यात नियमांनुसार घेतलेले हलाल प्रमाणपत्र; त्याबाबत पसरविण्यात येणारी माहिती दिशाभूल करणारी – गोकुळची अधिकृत भूमिका

 

 

कोल्हापूर : अलीकडे सोशल मीडियावर गोकुळ दूध संघाच्या हलाल प्रमाणपत्रासंदर्भात दिशाभूल करणारी माहिती व गैरसमज पसरविले जात असल्याच्या, पार्श्वभूमीवर गोकुळ प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. संघाकडून स्पष्ट करण्यात आले की, हलाल प्रमाणपत्र हे कोणत्याही धार्मिक प्रचार, सक्ती किंवा विचारसरणीशी संबंधित नसून आंतरराष्ट्रीय व्यापारातील एक आवश्यक व्यावसायिक व गुणवत्तेशी संबंधित आहे. ‘हलाल’ या शब्दाचा अर्थ ‘वैध’ किंवा ‘परवानगी असलेला’ असा असून, खाद्यपदार्थांच्या उत्पादन प्रक्रियेत कोणतेही प्रतिबंधित किंवा भेसळयुक्त घटक वापरलेले नाहीत, याची खात्री या प्रमाणपत्राद्वारे केली जाते.

 

 

 

 

गुणवत्ता तपासणीची प्रक्रिया

 

डेअरी उद्योगात लोणी, चीज, श्रीखंड, तूप, मिल्क पावडर यांसारख्या उत्पादनांमध्ये वापरले जाणारे घटक यांचे काटेकोरपणे तपासले जातात. दुग्धजन्य पदार्थांमध्ये वापरले जाणारे घटकसुद्धा हलाल मानांकनानुसार असल्याची खात्री या प्रक्रिय

🤙 8080365706