कोल्हापूर : येथील विद्यासन्मतिदास सेवा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री मज्जीनेंद्र पंचककल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या महामहोत्सवाला उपस्थित राहून जैन समाज बांधवांशी संवाद साधला.
जैन समाजाच्या हक्कासाठी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्याद्वारे या समाजातील बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा अशी शासनाची भूमिका असल्याचे मत याप्रसंगी आमदार नरके यांनी व्यक्त केले.
यावेळी जैन समाजाच्या वतीने एकनाथ शिंदे यांना ‘गुणरत्न भूषण’ या विशेष पदवीने सन्मानित करण्यात आले.
यावेळी आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख रवींद्र माने तसेच शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि जैन समाज उपस्थित होते.