कोल्हापूर– शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ.आप्पासाहेब पवार यांची जयंती आज विद्यापीठात
उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू
डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते प्रथम कुलगुरू डॉ.आप्पासाहेब पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन
अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.सी.एच.भोसले, डॉ.
सी. एच. पवार, डॉ.तानाजी चौगले, डॉ.शरद बनसोडे, विद्यार्थी भवनचे रेक्टर डॉ.दिपक भादले, डॉ.मिना पोतदार, डी.
बी. साबळे, डॉ.माधुरी वाळवेकर, पवन कांबळे, श्रुतिका निकाळजे, विद्यार्थी भवनचे आजी माजी विद्यार्थी आणि
प्रशासकीय सेवक, अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.