उमरखेड आ. किसन वानखेडे यांची रत्नाप्पाना कुंभार सूतगिरणीला भेट

कुंभोज( विनोद शिंगे)
देशभक्त रत्नाप्पाना कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूत गिरणी तमदलगे येथे उमरखेड विधानसभा जिल्हा यवतमाळ येथील आमदार किसन मारोती वानखेडे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी सूतगिरणी पाहून समाधान व्यक्त केले. 

त्यांनी दलित मित्र आमदार डॉ अशोकराव माने यांचे व संचालक मंडळ यांचे कौतुक केले. यवतमाळ येथील कापूस दर्जेदार असून पश्चिम महाराष्ट्र मध्ये कापूस पिकत नसताना देखील या भागात सहकाराच्या माध्यमातून सूत गिरण्यानी देश आणि देशाबाहेर लौकिक प्राप्त केला आहे असे प्रतिपादन केले यावेळी उपस्थित जिल्हा परिषद माजी सदस्य प्रसाद खोबरे,अंकुश वानखेडे उमरखेड,संस्थापक उपाध्यक्ष समाजभूषण अनिल कांबळे माणगाववकर,संस्थापक अध्यक्ष आमदार अशोकराव माने,आमदार किसन वानखेडे,माजी नगराध्यक्षा डॉ नीता माने, स्वाती भापकर इत्यादी उपस्थित होते.

🤙 9921334545