कुंभोज ( विनोद शिंगे)
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे आज हातकणंगले आळते येथील गेल्या अनेक वर्षापासून हजारो कामगारांच्या हाताला काम देणाऱ्या पूर्वी पण वादिती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व सध्या इंडो काउंट नावाने कोल्हापूर सह महाराष्ट्रात सुती व्यवसायासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कंपनीला भेट दिली या कंपनीच्या मॅनेजिंग कमिटी व सर्व अधिकारी वर्गाच्या वतीने विधानसभेचे सभापती राम शिंदे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला .
सभापती राम शिंदे यांनी इंडोकॉन कंपनीच्या पूर्ण श्रुती व्यवसायाची माहिती घेऊन सुती व्यवसायासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित त्यांना दिले यावेळी,सागर पुजारी, हिंगणगाव सरपंच दिपक पाटील,सोनाली उद्योग समूहाचे प्रमुख संदीप कारंडे तसेच इंडॉकंट सूतगिरणीच्या अधिकारी वर्ग व कर्मचारी तसेच हातकणंगले तहसीलदार सुशील बेलेकर प्रांताधिकारी पोलीस निरीक्षक उपस्थित होते. आज सभापती राम शिंदे हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर असून ते आपल्या दौऱ्यामध्ये हातकणंगले व शिरोळ तालुक्यात सहकारी व खाजगी तत्त्वावर चालणाऱ्या सूतगिरण्यांना भेट देणार असून त्यांचा हा दौरा हातकणंगले शिरोळ तालुक्याला सुत व्यवसायिकांच्यासाठी नक्कीच उभारणी देणारा ठरेल असे मत यावेळी राजकीय जानकारांनी व्यक्त केले.विनोद