कुंभोज (विनोद शिंगे)
आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या पुढाकारातून जिल्हा नगरोत्थान योजनेअंतर्गत इचलकरंजीतील सांस्कृतिक हॉल (सा. नं. १०२) चे स्लॅब पूजन व गरीब तसेच विधवा महिलांना साड्यांचे वाटप हे कार्यक्रम साईट नं. १०२, हनुमान मंदिराजवळ, इचलकरंजी येथे पार पडले. हा कार्यक्रम आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब, माजी आमदार सुरेश हाळवणकर व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमास शहराध्यक्ष अमृत भोसले, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, माजी सभापती संजय केगार, दिलीप मुत्ता, माजी नगरसेवक मारुती पाथरवड, राजू आलासे, बिट्टू सूर्यवंशी, चंद्रकांत चौगुले, विनोद कांबळे, रामा गळदगे, मंगल सुर्वे, बेबीताई भिऊगडे, राजेश रजपूत, एकनाथ पारशे यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते