कुंभोज (विनोद शिंगे)
नरंदे तालुका हातकणंगले येथे श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने शुक्रवारी २ मे रोजी बालाजी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व वास्तुशांती समारंभ व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने गुरुवार दिनांक १मे रोजी दुपारी बालाजी मूर्तीची नरंदे गावातुन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
अशी माहिती श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट नंदिवाले समाज यांच्या वतीने महेश उर्फ लक्ष्मण नंदीवाले व शिवाजी नंदिवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात दिले आहे. तरी वास्तुशांती व प्राणप्रतिष्ठापना समारंभासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट नरंदेच्या वतीने करण्यात आले आहे.