कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील १२ वर्षांच्या जनसेवा, सुशासन आणि विकासाच्या प्रवासावर आधारित ‘लोकसेवा हेच उद्दिष्ट’ हे विशेष पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून मोदीजींचा सेवा, सुशासन आणि गरिबांच्या कल्याणाचा अभूतपूर्व प्रवास जनतेसमोर येत आहे.

या अभियानांतर्गत कागल विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज येथे ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट नंदकुमार शेळके यांची सदिच्छा भेट खा.धनंजय महाडिक यांनी घेतली. यावेळी त्यांना ‘लोकसेवा हेच उद्दिष्ट’ हे पुस्तक भेट देण्यात आले.
देशाच्या विकासात व्यावसायिक, उद्योजक आणि करदात्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विविध लोककल्याणकारी उपक्रमांमुळे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचत असल्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
आदरणीय मोदीजींचा हा ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ हा विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन खासदार महाडिक यांनी केले.
