कोल्हापूर: आ . चंद्रदीप नरके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून सव्वा वर्षात करवीर विधानसभा मतदारसंघातील गगनबावडा व संभाजीनगर आगारांसाठी तब्बल ३० नवीन एसटी बसेस उपलब्ध झाल्या आहेत.

यातील नव्याने दाखल झालेल्या ५ ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचे लोकार्पण रंकाळा बसस्थानक, कोल्हापूर येथे करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक तसेच नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुरक्षित, नियमित आणि सुखकर प्रवासाची सुविधा मिळावी, हा या प्रयत्नांचा मुख्य उद्देश आहे. नवीन बसेसमध्ये CCTV सुविधेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही अधिक प्राधान्य मिळणार आहे.
विशेषतः विद्यार्थ्यांच्या कॉलेजच्या वेळा लक्षात घेऊन ग्रामीण भागातून कोल्हापूर शहराकडे ये-जा करणाऱ्या बसेसच्या फेऱ्या व वेळापत्रक अधिक प्रभावी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
लवकरच संभाजीनगर आगारासाठी आणखी १० आणि गगनबावडा आगारासाठी आणखी ५ नवीन बसेस उपलब्ध होणार आहेत.
करवीरच्या प्रत्येक गावापर्यंत सुरक्षित, सक्षम आणि नियमित एसटी सेवा पोहोचविण्यासाठी माझा पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील.
