रुकडी परिसरातील रस्त्याकडील ओढा व नाल्यांची सफाई करा

कुंभोज ( विनोद शिंगे)
रुकडी गावातील सर्व भागातील गटारीचे पाणी गावाबाहेरील ओढ्यामध्ये बारमाही सोडण्यात आलेले आहे. परंतु सतत या ओढयामध्ये पाणी असल्यामुळे सदर ओढ्यामध्ये झाडेझुडपे वाढून पाणी पुढे जात नसल्याने सदरचे पाण्याचे दुर्गंधी येत आहे. सदर ओढा स्वच्छ करणे संबंधित ग्रामसेवक यांना परिसरातील नागरिकांनी निवेदन यापूर्वी ग्रामपंचायत सरपंच यांना दिलेले आहे.

सदर ओढ्यालगत रस्ता असल्याने येणारा जाणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फार त्रास होत असल्याने सदर सरपंच यांनी पावसाळ्यापूर्वी सदरच्या ओढ्यामधील झाडेझुडपे व कचरा काढून सदर पाणी जाण्यास वाट करण्याची विनंती आहे. आपण ताबडतोब सदर ओढयाची पाहणी करून सदर ओढ्यामधील कचरा लवकारात लवकर काढून सहकार्य करावे अशी शेतकऱ्यांची विनंती केली आहे. अन्यथा सदर पावसाळ्यामध्ये ओड्याचे पाणी रस्त्यावर येऊन शेतकऱ्यांना येण्या जाण्यास अडथळा निर्माण होणार आहे. असे ग्रामस्थ व सर्व शेतकरी बंधूंच्या वतीने करण्यात येत आहे.

🤙 9921334545