कोल्हापूर : शिये (करवीर) येथे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर ‘सिद्धनाथ स्टोन क्रेशर’ या नव्या प्रेशर प्लांटचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. युवा उद्योजक दत्तात्रय शिंदे आणि रमेश शिंदे यांनी हा उद्योग सुरू केला असून, त्यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, विकास चौगुले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, विठ्ठल पाटील, विश्वनाथ, शहाजी काशीद, प्रभाकर काशीद, हंबीरराव कोळी तसेच शिंदे कुटुंबीय आणि अन्य क्रेशर व्यावसायिक उपस्थित होते.