ग्रामीण व शहरी भागातील खाजगी सावकारकी मोडीत काडा- पालकमंत्री प्रकाश आंबिटकर

कुंभोज (विनोद शिंगे)
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात खाजगी सावकारकीची जाळे मोठ्या प्रमाणात विणले गेले असून ,खाजगी सावकारकीच्या तगाद्यामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाले आहेत.परिणामी अनेक कुटुंबाची स्वतःचे हक्काची घरे व जमिनी खाजगी सावकारानी किरकोळ मोबदल्यात व चक्रवाढ व्याजात आपल्या नावावर करून घेतले असल्याने अनेक नागरिकांनी आत्महत्या सारखे पर्याय निवडले आहेत. परिणामी महिलांनी गळ्यातील मंगळसूत्र विकून सावकारांची व्याज भागवले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी सहकारकिला आळा बसने गरजेचे असुन त्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन व सहकार खात्याने लागेल ते प्रयत्न करून कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी सावकारी की मोडून काढावी, त्यासाठी शासन त्यांना लागेल की सहकार्य करेल, खाजगी सावकार किला कोल्हापूर जिल्ह्यात आळा घालणारच असे आव्हान कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी बोलताना व्यक्त केले

सावकारांच्या छळामुळे सामान्य माणसाला जिवंतपणी मरण सहन कराव्या लागत आहेत. सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले असल्याने यातून त्यांची सुटका करण्यासाठी सावकारीचा बंदोबस्त करा, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. ते सहकार दरबार कार्यक्रमात बोलत होते. जिल्ह्यातील सहकारी चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी सहकार दरबारमधून पाठबळ मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.पालकमंत्र्यांच्या कल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात सोमवारी सहकार दरबार भरविण्यात आला होता. याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

🤙 9921334545