हणमंतवाडी येथील जय बजरंग दुध संस्थेची पंचवार्षिक निवडणूकमध्ये जय बजरंग परिवर्तन विकास आघाडीचा विजय

कोल्हापूर : हणमंतवाडी (ता ,करवीर) येथील जय बजरंग दुध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, विद्यमान सरपंच तानाजी नरके,माजी सरपंच व विद्यमान सदस्य संग्राम भापकर यांच्या नेतृत्वातील जय बजरंग परिवर्तन विकास आघाडीचा विजय झाला.

 

सहकाऱ्यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे या दूध संस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन घडले. हे परिवर्तन घडण्यासाठी मा.महादेव शिंदे, बजरंग शिणगारे, रवी शिंगारे, बाबुराव शिणगारे, सर्जेराव धनघर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
या आघाडीचे विजयी उमेदवार महादेव कदम, युवराज जाधव,अजित झाजगे, भीमराव नरके, बाबुराव पाटील, अमर पिंजरे, मोहन भापकर, सीमा जाधव, कल्लाप्पा शिणगारे यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्या संपर्क कार्यालयात येऊन सदिच्छा भेट घेतली.
यावेळी सर्व विजयी उमेदवार, पॅनेल प्रमुख आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा विजय म्हणजे लोकांनी आपल्यावर मोठा विश्वास दाखवला आहे आता आपली जबाबदारी आहे की या संस्थेचे काम उत्तम करत लोकांचा विश्वास सार्थकी लावला पाहिजे, अशी भावना यावेळी व्यक्त केली

🤙 9921334545