कोल्हापूर : केंद्र सरकारच्या रोपवे कार्यक्रम-पर्वतमाला योजनेतून पन्हाळा ते जोतिबा आणि विशाळगड या ठिकाणी रोप वे उभारण्यात यावेत अशी मागणी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली होती. या दोन्ही ठिकाणी रोप वे झाल्यास पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला होता.
याचेच फलित म्हणून या दोन्ही ठिकाणी रोप वेच्या प्रस्तावाला राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. या नाविन्यपूर्ण कामात खारीचा वाटा उचलू शकलो याचा मनस्वी आनंद आहे.असे मत आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केले.