आ. राहुल आवाडेंच्या हस्ते KTFT फुटबॉल क्लबतर्फे आयोजित फुटबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण

कुंभोज( विनोद शिंगे)
KTFT फुटबॉल क्लबतर्फे आयोजित फुटबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते तांबे माळ शाळा क्रमांक 23, इचलकरंजी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात विजेत्या संघांना गौरविण्यात आले.

 

 

तसेच आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि खेळातील सहभाग वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले.

यावेळी भाजप शहराध्यक्ष अमृत भोसले, गणेश पाटील, तात्या कुंभोजे, योगेश पाटील यांच्यासह फुटबॉल खेळाडू प्रशिक्षक व प्रेमी उपस्थित होते.