कुंभोज(विनोद शिंगे)
आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या अथक प्रयत्नातून स्वामी अपार्टमेंट ते ठाकरे चौक ते मराठा चौक ते जुना एसटी स्टँड या परिसरातील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी आपल्या भाषणातून या कामाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि गावाच्या विकासासाठी यासारख्या प्रकल्पांचे योगदान अधोरेखित केले.
आमदार डॉ. राहुल प्रकाश प्रकाश आवाडे साहेब यांनी विकास कामांबाबत आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की “रस्ते, पायाभूत सुविधा आणि विकासकामे ही ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वाची आहेत. हा प्रकल्प म्हणजे जवाहर नगर परिसरातील ग्रामस्थांना आधुनिक व सुगम प्रवासाची भेट आहे.”
यावेळी माजी सभापती राजू बोंद्रे, बंडू मुळीक, माजी नगरसेवक मनोज हिम्मेरे, दत्ता मांजरे, माजी नगरसेवक उत्तम विभुते, सुनील पवार, भास्कर बांधिगिरे, सुनील कोरवी, सुबोध कोळी, बाळासाहेब माने, बबन केटकाळे, विजय कोराने, सतीश घोरपडे, राजू देसाई, नितीन विभुते, राजाराम पोवार यांच्यासह भागातील प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.