कुंभोज ( विनोद शिंगे)
माणगाव(ता.हातकणंगले) येथेअज्ञात समाज कंटक ऊस पिक जाळत आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याची दखल घेत हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी तात्काळ बैठक आयोजित करून गुन्हेगारांना लवकरात लवकर शोधून काढून कडक शासन करण्यासंदर्भात हातकणंगले पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांना सूचना दिल्या.
यावेळी माणगाव गावचे लोकनियुक्त सरपंच राजू दादा मगदूम,जेष्ठ नेते जिनगोंडा पाटील उपसरपंच उमेश जोग, ग्रा.प अनिल पाटिल,जिनगोंड पाटिल, अविनाश माने, शरद पाटील, सुनिल माने, आण्णा पाटिल, नंदकुमार शिंगे, अंकुश चव्हाण, अभिषेक मगदुम,शितल भरमगोडा,मायापा जोग,अमोल मगदुम, नितीन कांबळे, प्रकाश पाटील, राजगोड पाटील राणोजी जोग यासह ग्रामस्थ शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.