कुंभोज ( विनोद शिंगे)
इचलकरंजी ता हातकणंगले येथील पोलीस मित्र असोसिएशन व वेध फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या हस्ते व
वैद्यकीय अधीक्षक इंदिरा गांधी सामान्य शासकीय रुग्णालय इचलकरंजी डाॅ. भाग्यरेखा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी राज्य संपर्कप्रमुख पोलीस मित्र डाॅ. युवराज मोरे,महिला राज्याध्यक्ष पोलीस मित्र डाॅ. रजनीताई शिंदे, राज्य संपर्कप्रमुख मुरलीधर शिंदे,पत्रकार अन्वर मुल्ला यांसह पोलीस मित्र महिला टीम व पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.