भगिनींनो निर्णयक्षमते व्हा, योग्य व्यक्ती खासदार निवडा : युवराज्ञी संयोगितराजे छत्रपती यांचे आवाहन

(कंदलगाव, मोरेवाडी, पाचगाव भागात प्रचार दौरा)

कोल्हापूर : समाजात जातीय विषमता पसरवली जात आहे, लोकशाही संकटात येऊ पाहत आहे, संविधान धोक्यात आहे, महिला सुरक्षित नाहीत, कोल्हापुरात जातीय दंगली सारखे निंदनीय प्रकार होऊ लागलेत अशा वेळी भगिनींनो निर्णयक्षमते व्हा. समाजात समतेचा विचार रुजविण्यासाठी, सर्वांगीण विकासाच्या दिशेने जाण्यासाठी अभ्यासू व सर्वांसोबत नेहमीच असणारे शाहू छत्रपती महाराज हेच योग्य उमेदवार म्हणून आपणांस दिसतील. अशी योग्य व्यक्ती खासदार निवडा, असे आवाहन युवराज्ञी संयोगितराजे छत्रपती यांनी केले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचा दक्षिण विधानसभा मतदारसंघात गाव टू गाव प्रचार सुरु आहे. कंदलगाव, मोरेवाडी, पाचगाव येथील आयोजित सभेत त्या बोलत होत्या. विविध मान्यवरांनी लोकसभेला छत्रपती शाहू महाराजाना विजयी करणारच असा मनोदय बोलून दाखविला.

यावेळी केडीसीसी बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, आक्काताई पुंदिकर, सरीता खाडे, सुनीता पाटील, दगडू रणदिवे, श्रीपती पुंदीकर, किरण निर्मळ, अजित पाटील उत्तम पाटील, अंबाजी पाटील, चंद्रकांत अतिग्रे, शाहू संकपाळ, पांडुरंग सुतार, रामचंद्र सुतार, मारुती रणदिवे, संतोष गुरव (कंदलगाव) माजी जि.प.सदस्या मनीषा वास्कर, सरपंच ए.व्ही. कांबळे, शिवसेनेचे विराज पाटील, हरीष कारंडे, सिद्धी कारंडे, शितोळे सर, अरुण अद्वगिरी, संदीप भिलगुडे, सुदर्शन पाटील, कुलदीप कोथळे, दत्तात्रय भिलवडे ( मोरेवाडी ) सरपंच प्रियांका संग्राम पाटील, उपसरपंच सचिन पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण, संजय शिंदे, शांताराम पाटील, सागर दळवी, कुंभार, म्हात्रे महाराज, सुरेश मगदूम, सामाजिक कार्यकर्ते सुमित पताडे, आनंदराव यादव, सचिन भोसले (पाचगाव) यांचेसह महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.