शाहू छत्रपती महाराजांच्या विजयात गडहिंग्लज करांचे योगदान मोठे असेल : संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर : सुसंस्कृत, संयमी आणि सर्वांना घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून श्री शाहू छत्रपती महाराजांकडे पाहिले जाते. त्यांच्या विचारांचा, अनुभववाचा कोल्हापूर जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने निश्चितच फायदा होणार आहे. शाहू छत्रपती महाराजांना संसदेत पाठवण्याची इच्छा सर्व कोल्हापूरकरांची आहे. महाराजांचा विजय निश्चित असून या विजयात गडहिंग्लजकरांचे योगदान मोठे असणार आहे, असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारासाठी संभाजीराजे छत्रपती गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण जिल्ह्यात संपर्क दौरा करत आहेत. काल गडहिंग्लज दौऱ्यावर असताना झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी गडहिंग्लजमधील जनतेशी संवाद साधत छत्रपती शाहू महाराजांना विजयी करण्याचे आवाहन केले.

या सभेला मा. नगराध्यक्षा स्वातीताई कोरी, शिवसेनेचे दिलीप माने, मा.उपनगराध्यक्ष महेश कोरी, बसवराज आजरी, अरुण कलाल, दयानंद खन्ना, संदिप कागवाडे यांचेसह विविध मान्यवर, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.