आम्हालाच उमेदवारी द्या: खा. मंडलिक, मानेंचा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ नवीन टर्मिनलचा लोकार्पण सोहळा उजळाईवाडी येथे आज पार पडला. या कार्यक्रमावेळी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. सोहळ्यावेळी उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेउन आम्हालाच लोकसभेची उमेदवारी द्या असा आग्रह खा. संजय मंडलिक यांनी केला.

सोमवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर दिल्लीला जाणार असून त्या वेळी पक्षश्रेष्ठीकडे त्या बाबत आग्रह धरू असे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याना सांगितले. दरम्यान जिल्ह्यातील एक जागा भाजपला दिली तर मी किंवा समरजित घाटगे लढायला तयार आहे. असे खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांनी सांगितले.

या घडामोडी पाठोपाठ एक महत्त्वाची राजकीय घटना घडली तीन अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेउन आपल्याला निवडणूक उमेदवारी बाबतीत विश्वासात घेत नाहीत अशी नाराजी व्यक्त केली. आता कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी खा.संजय मंडलिक, धनंजय महाडिक कि समरजित घाटगे यांच्या पैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.