श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हात चिन्हावर लढणार…

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडीना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी निश्चित मानली जाते. ते काँग्रेस कडून हात या चिन्हावर लढणार असल्याचे सांगण्यात आले.

उद्या सोमवारी त्या बाबतीत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी महाविकास आघाडीकडून लढण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे आग्रही होते .काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा पाठिंबा घेत त्यानी लढण्याची तयारी दाखवली आहे.दरम्यान ते कोणत्या पक्षाकडून लढणार या बाबत चर्चा सुरू होती. दरम्यान वरिष्ठ पातळीवर राजकीय घडामोडी होउन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची काँग्रेस कडून हात चिन्हावर लढण्याची तयारी झाली आहे असे विश्वासू सुत्रानी सांगितले.