राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाची असंघटित कामगार सेल कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे असंघटित कामगार सेल विभागाची आढावा बैठक झाली. पक्षाचे शहर कार्यालय शिवाजी स्टेडियम कोल्हापूर येथे झालेल्या या बैठकीस जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अध्यक्ष,कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेशच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा, मीनाताई मोहिते पाटील तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे निरीक्षक सागर झणझणे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष अरबाज नालबंद यांच्या उपस्थितीत सदर बैठक झाली. 

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना असंघटित कामगार सेलच्या कार्यकर्ते व पदाधिकारी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी व त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे हा याच्या मागचा उद्देश होता .या कार्यक्रमाचे स्वागत पन्हाळा तालुका अध्यक्ष अमित आतीग्रे यांनी केले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष नितीन मस्के म्हणाले, ” कोणतेही पाठबळ अथवा गॉडफादर नसताना माझ्या स्वतःच्या हिमतीवर पक्षाच्या असंघटित कामगार सेलच्या हजारो कामगारांची नोंदणी केल्या व त्यांना सर्वाना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. म्हणून कोल्हापूर जिल्हा असंघटित कामगार हा विभाग महाराष्ट्रात एक नंबर आहे. आपला पाठिंबा राहिल्यास त्याच्यापेक्षा जास्त काम करीन ” अशी खात्री दिली. यावेळी विविध कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आपल्या समस्या मांडल्या. यावर मीनाताई मोहिते पाटील म्हणाल्या, ” वेळोवेळी तुमच्याकडून माहिती घेतल्यानंतर तुमचे काम समाधानकारक आहे. याची खात्री आहे. तरीसुद्धा तुमच्या काय समस्या असतील तर त्या पंधरा दिवसात सोडवीन त्याची ग्वाही देते, ” या कार्यक्रमाचे आभार हातकणंगले अध्यक्ष सागर कांबळे यांनी मानले.

यावेळी शिरोळ तालुकाध्यक्ष निसार बहादुर,जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भोसले, करवीर तालुका अध्यक्ष अमित कांबळे, उत्तम दुर्गुळे, नागेश जाधव, संदीप साळोखे,रोहित शिंदे,सर्जेराव डाफळे, उदय पाटील, विशाल कांबळे, नवाज शेख, जहीर बहादूर, शिवाजी पाटील, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.