उद्धवजींचा आदेश हा शिवसैनिकांना अंतिम: कोल्हापूर जिल्हा लोकसभा समन्वयक सुनील पाटील

कोल्हापूर : उद्धवजींचा आदेश हा शिवसैनिकांना अंतिम आहे. असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा लोकसभा समन्वयक सुनील पाटील यांनी केले. दक्षिण ग्रामीण पदाधिकारी यांची बैठक उंचगाव येथे मंगेश्वर मंदिरात पार पडली त्यावेळी ते बोलत होते. उद्धवजींचा आदेश हा शिवसैनिकांना अंतिम पक्षातून काही गद्दार निघून गेले मातोश्रीने इतकं भरभरून दिलं होतं आमदारकी, मंत्री पद इतकं देऊनही ते स्वार्थासाठी निघून गेले. पण मूळ शिवसैनिक हा शिवसेनेबरोबरच आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख उपनेते संजय पवार म्हणाले की, येत्या लोकसभेसाठी भाजपला आणि गद्दारांना गाढण्यासाठी उद्धवजींचा शिवसैनिक सज्ज आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी जे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी चांगले काम केले आहे. कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात बसले आहेत.

ती सर्व जनता यावेळी शिवसेनेबरोबर राहील. करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, भाजपाच्या खोट्या सोशल मीडियावरच्या हिंदुत्वाला आता जनताच येत्या निवडणुकीत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. यावेळी सह संपर्कप्रमुख विजय देवणे , उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट ,अवधूत साळुंखे, तालुकाप्रमुख विनोद खोत, विराज पाटील,महिला आघाडीच्या स्मिताताई मांडरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले,

यावेळी उपस्थित विक्रम चौगुले, दीपक रेडेकर, विराग करी ,अरविंद शिंदे, दत्ता पाटील, योगेश लोहार, दीपक पाटील, शरद माळी, अरुण अब्दागिरी, राहुल गिरुले , दयानंद शिंदे, शांताराम पाटील, उत्तम आडसूळ, सरदार तिप्पे, डॉक्टर अनिल पाटील, जिवनतात्या पाटील, बाबुराव पाटील, विकी काटकर, संतोष चौगुले, आबा जाधव, आनंदा नाईक, महादेव खोचगे , कैलास जाधव, बाळासो नलवडे, अभिजीत पाटील, सचिन नागटिळक, अजित चव्हाण, दत्तात्रय विभूते, अजित पाटील ‌, सुरज इंगवले, विनायक रुपनाळकर, अनिल गाताडे, विनोद जाधव, नागेश शिरवटे आदी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व शाखाप्रमुख उपस्थित होते.