महिलांनी स्वतःसाठी वेळ द्यावा : सौ. पूजा ऋतुराज पाटील

कसबा बावडा: महिलांमध्ये नैसर्गिक ऊर्जेचा स्त्रोत असतो. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होणे अवघड नाही. स्वतःचे महत्त्व लक्षात घेऊन स्वतःसाठी महिलांनी वेळ देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपच्या ॲडव्हायझर पूजा ऋतुराज पाटील यांनी केले.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय,कोल्हापूर येथे आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सपूजा ऋतुराज पाटील होत्या. यावेळी सी एच आर ओ श्रीलेखा साटम यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी “इन्स्पायर इन्क्लुजन” नावाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थीनींसाठी रांगोळी, मेहेंदी, पोस्टर प्रेझेंटेशन तसेच महिला शिक्षक कर्मचाऱ्यांकरिता सॅलेड डेकोरेशन व पौष्टिक पाककृती स्पर्धा तसेच महिला सफाई कर्मचारी यांच्याकरिता उखाणा स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होतेया सर्व स्पर्धेच्या नेटक्या आयोजनाचे व समन्वयकांचे पूजा पाटील यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित विद्यार्थीनि, महिला कर्मचारी यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन देताना त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रेरणास्रोत असलेल्या महत्वाच्या स्त्रियांच्या उल्लेख केला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. सौ. मधुगंधा मिठारी व सौ. गौरी मेहेतर यांनी केले. तसेच मुख्य समन्वयिका सौ शताक्षी कोकाटे व सौ. नीला जिरगे यांनी नेटके संयोजन केले. प्रमुख अतिथींचे आभार प्रा. सौ. नीला जिरगे यांनी मानले.