उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना दिली ऑफर

मुंबई: भाजपने लोकसभेसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह 195 दिग्गज लोकांचा समावेश आहे. आश्चर्यायची गोष्ट म्हणजे यात महाराष्ट्रातील एकही नाव नाही. पहिल्या दिग्गज लोकांच्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने विरोधकांकडून भाजपवर तोंडसुख घेतलं जात आहे. यावरुन माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना ऑफर दिली आहे. ठाकरे धाराशिव येथे बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपचा राजीनामा देण्याचं आवाहन केलं. तसेच त्यांनी उघडपणे नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीसोबत येण्याचं आवाहन केलं. महाविकास आघाडी नितीन गडकरी यांना निवडून आणेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यावर अद्याप नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली नाही. पण, भाजपचे नेते काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.