बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी जाणून घेऊया…

बिद्री : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची सध्या मतमोजणी सुरू असून उत्पादक गटातील उमेदवारांना १ ते १२० अशी केंद्रनिहाय पडलेली मते जाहीर करण्यात आली आहे. सत्ताधारी गट विजयाच्या दिशेने पावले टाकत आहे. निवडणूक मतमोजणी सायंकाळपर्यंत पूर्ण करण्याची माहिती यावेळी निवडणूक अधिकारी अरुण काकडे यांनी दिली.

आज सकाळी आठ वाजता पहिल्या टप्प्यातील 120 मतदान केंद्राची मतमोजणी सुरू झाली. यामध्ये राधानगरी तालुक्यातील 51, कागल तालुक्यातील 48, भुदरगड तालुक्यातील 21 केंद्राची मोजणी 1.30 वा. पर्यत झाली असून आतापर्यंत तब्बल 34 हजार 489 मतांची मोजणी झाली आहे.

जेवणानंतर दुसऱ्या टप्प्यातील 53 केंद्रांची मतमोजणीस सुरूवात होणार आहे. भुदरगड तालुक्यातील 42 व करवीर तालुक्यातील 21 केंद्रांतील 14 हजार 451 मतांची मोजणी होईल. सहा वाजेपर्यंत सर्व मतमोजणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने निवडणूक विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.