कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री बळीराजा पानंद योजनेचे सर्वप्रथम दोन क्लस्टर कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघात          मंत्री हसन मुश्रीफ यांची आढावा बैठकीत माहीती

कागल:मुख्यमंत्री बळीराजा शेतरस्ते व पाणंद योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले दोन क्लस्टर कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघात मंजूर झाले आहेत. त्यामुळे या योजनेअंतर्गत ५० किलोमीटर लांबीच्या शेतरस्ते व पाणंद रस्त्यांना प्रशासकीय मान्यतेसह निधी मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

 

 

 

यापैकी एका क्लस्टरमध्ये कागल तालुक्यातील २५ किलोमीटर लांबीच्या शेत व पानंद रस्त्यांचा समावेश आहे. तसेच; दुस-या क्लस्टरमध्ये गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील साडेबारा किलोमीटर व आजरा तालुक्यातील उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातील साडेबारा किलोमीटर अशा एकूण २५ किलोमीटर लांबीच्या शेत व पानंद रस्त्यांचा समावेश आहे.

 

मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कागल शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक झाली. या बैठकीत या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 

मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री बळीराजा शेतरस्ते व पाणंद रस्ते योजनेअंतर्गत कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघातील किमान सात ते आठ क्लस्टर्सना मंजुरीसाठी प्रयत्न आणि पाठपुरावा करीत आहोत. प्रत्येक क्लस्टरमध्ये २५ किलोमीटर शेतरस्ते व पाणंद रस्त्यांचा समावेश होणार आहे. त्यापैकी; पहिल्या क्लस्टरमध्ये कागल तालुक्यातील २५ किलोमीटर शेतरस्ते व पाणंद रस्त्यांचा समावेश आहे. दुस-या क्लस्टरमध्ये गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील साडेबारा किलोमीटर लांबीचे शेतरस्ते व पाणंद रस्ते आणि आजरा तालुक्यातील उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातील शेतरस्ते व पाणंद रस्ते, असे २५ किलोमीटरचे मंजूर झालेले आहे.

 

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे,आजरा गटविकास अधिकारी सुभाष सावंत, गडहिंग्लजचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, उपविभागीय पोलिस अधीक्षक (गडहिंग्लज)सतीश होडगर, बळीराजा शेत पाणंद पारिसा जंगटे, गणपतराव सांगले, पांडुरंग तेलवेकर, बाबासाहेब सांगले, किशोर अहिरे, विजय शेळके, महेश मोहिते, अमित लोंढे, हरिश्चंद्र शितोळे, भूषण पाटील, एम. डी. सांगावकर, कल्याणी गोडसे, समीर खडकेवाले, महेश कुंभार, सुरज कुंभार, धनाजी मच्छेर, तेजस्विनी पवार, राहुल कुंभार, सचिन सावंत, विनायक कुलकर्णी, अश्विनकुमार कचरे, सी. ए. पाटील, अमित पाटील, महेश पवार, सुरेश बांदीवडेकर, पंडित कोडोलीकर, राजेंद्र गायकवाड, सतीश आणेकर आदी प्रमुख उपस्थित होते.

 

🤙 8080365706