मळगे बुद्रुकमध्ये चोरी; तिजोऱ्या फोडून 3 लाख 37 हजारांचा ऐवज लंपास

कोल्हापूर : मळगे बुद्रुक ते मळगे खुर्द दरम्यानच्या मेन रोडवरील 4 घरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तिजोऱ्या फोडल्या. सोने, चांदी, रोख रक्कम आणि सहावारी साड्या, कोंबड्या असा एकूण 3 लाख 37 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. मुरगूड पोलीस ठाण्यात या चोरीची नोंद करण्यात आली आहे.

 

महिपती मारुती परबकर रा. मळगे बुद्रुक ता. कागल यांनी चोरीची फिर्याद पोलिसात दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मळगे बुद्रुक ता. कागल येथील मळगे बुद्रुक ते मळगे खुर्द जाणाऱ्या मेन रोडवर महिपती परबकर यांच्या घरातील लोखंडी तिजोरीचे लॉक उचकटून चोरी करण्यात आली. तसेच मळगे बुद्रुक गावातील इतर लोकांच्या घरातील तसेच शेतातील गोठ्यातून दत्तात्रय मारुती कमळकर, रामचंद्र गणपती जाधव, भरत शंकर अस्वले सर्व रा. मळगे बुद्रुक ता. कागल यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी तिजोरीचे लॉक उचकटून असा एकूण 3 लाख 37 हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली.

 

चोरट्यांनी सोने, चांदी व रोखडी बरोबरच 27 कोंबडे आणि 8 नवीन सहावारी साड्या देखील लंपास केल्या आहेत.

 

या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील करीत आहेत.

 

 

🤙 8080365706