राज्यावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र; जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता

मुंबई : महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होत आहेत. राज्यावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्र, मध्य व पूर्व विदर्भासह मराठवाड्यातील पूर्वेकडील जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता निर्माण होईल.

मॉन्सूनचे आगमनासाठी हवेचे दाब कमी होणे अत्यंत गरजेचे आहे. मॉन्सून आगमनासाठी हवेचे दाब अनुकूल बनत आहेत. बंगालच्या उपसागरावर ढगांची दाटी वाढत असून हिंदी महासागरावरही ढगांची दाटी वाढेल. केरळात आजपासून (ता.४) मॉन्सून दाखल होण्यास हवामान अनुकूल बनत आहे.कमाल तापमान मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअस तर पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे शक्‍य आहे. कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ होणे शक्य आहे. त्यामुळे हा आठवडा अतिउष्ण जाणवेल.