त्रेवार्षिक यात्रा काळात वाहतुकीची कोंडी होवू नये याबाबत योग्य ती उपाययोजना करणेबाबत

त्रेवार्षिक यात्रा काळात वाहतुकीची कोंडी होवू नये याबाबत योग्य ती उपाययोजना करणेबाबत…

उचगांव व वळीवडे येथील त्रेवार्षिक यात्रे निमित्य मोठा भक्त समुदाय भाविक येण्याची शक्यता आहे. कोरोना कालावधी नंतर दिर्घकाळ खंडीत झालेली यात्रा आता होत असल्याने ग्रामस्थ व भाविक आणि भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसुन येत आहे. उचगांव फाटा असो, उचगांव महामार्गावरील उचगांव उड्डानपुल असो किंवा तावडे हॉटेल उड्डाण पुलाखाली वाहतुकीची कोंडी असो या कोंडीबाबत यात्रा काळात तरी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न व्हावेत, उपाययोजना करावी, प्रसंगी पोलिसांची जादा कुमक मागवून वाहतुक कशी सुरळीत होईल यासाठी आपण उपाययोजना करावी.

संबंधीत गावच्या यात्रा कमिटीशी चर्चा करून त्या गावातील पार्किंग व्यवस्था कुठे असेल यात्रेकरूंचे येण्या-जाण्याचे मार्ग कसे व कोणते असतील याबाबत सर्वाना माहिती होणे गरजेचेआहे. वळीवडे येथील दि. ०५/০४/२०२४ व ०८ /०४/२०२४ हे यात्रेचे मुख्य दिवस या दिवशी भाविक व नागरीकांची गर्दी होण्याचा दिवस, तसेच उचगांव येथे दि. १९/०४/२०२४ ते२४/०४/२०२४ तारखेपर्यंत यात्रा असल्याने येथे ही रविवार व बुधवार या दिवशी मोठी गर्दी होण्याची व वाहतुकची कोंडी होण्याचा दिवस असल्याने संबंधीत यात्रा समितीशी संपर्क साधुन यावर योग्य ती उपाययोजना केल्यास वाहतुकीची कोंडी होणार नाही व यात्रेकरूंनाही त्याचा त्रास होणार नाही. सबब वाहतुक व्यवस्थेबाबत आपण सजग असावे ही करवीर शिवसेना उध्दवबाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे.
या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने मा. दिपक जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षकसो, गांधीनगर पोलीस ठाणे यांना देण्यात आले.
यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की, कोरोना काळानंतर सहा वर्षांनी यात्रा येत आहे.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये व भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. यामध्ये वाहतूकोंडीमुळे कोणाचीही गैरसोय होऊ नये याची दक्षता घ्यावी.
यावेळी निरिक्षक दिपक जाधव साहेब यांनी संगितले की वळीवडे येथे वाहतुकीचे योग्य नियोजन केले आहे तसेच उंचगावं येथे यात्रा कमिटी व तुमच्या सर्वांच्या सहाय्याने योग्य नियोजन करू असे आश्वासन शिष्ठमंडळाला दिले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट,उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, ग्रा. पं.सदस्य विराग करी, विभागप्रमुख विरेंद्र भोपळे, शाखाप्रमुख दिपक अंकल,उपशाखाप्रमुख सुनिल पारपानी, अजित चव्हाण, आबा जाधव, किशोर कामरा, गणेश सुतार आदी उस्थित होते.