ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या फेऱ्यात, अमोल कीर्तीकर यांना चौकशीसाठी समन्स

शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) उमेदवार अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) ईडी (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. अमोल किर्तीकर यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स देण्यात आलं असून आज ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत.

ईडी कार्यालयाने कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी (BMC Covid Scam) चौकशीसाठी अमोल कीर्तीकर यांना हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आलं आहे. अमोल कीर्तीकर यांना ठाकरे गटाने लोकसभेचं तिकीट दिलं आहे, त्यातच उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांना ईडीने समन्स दिलं होतं. आता निवडणुकीआधी त्यांची ईडी चौकशी होणार आहे.

अमोल कीर्तीकर यांना चौकशीसाठी समन्स

कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा (BMC Khichadi Scam) प्रकरणामध्ये ईडीकडून ठाकरेंचे शिलेदार अमोल कीर्तीकर यांची चौकशी केली जाणार आहे. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सप्टेंबर महिन्यामध्ये याच कठीण खिचडी घोटाळा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर या सगळ्याचा तपास ईडीकडून केला जात आहे. यामध्ये कथित खिचडी घोटाळा प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आता अमोल कीर्तीकर यांच्यावर ईडीची टांगती तलवार आहे.

ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या फेऱ्यात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनउत्तर पश्चिम मुंबईलोकसभा मतदारसंघांमध्ये (Mumbai North West Lok Sabha Constituency) अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अमोल कीर्तीकरांवर अटकेची टांगती तलवार?

मुंबई महापालिकेत कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे शिलेदार आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात ईडी पुन्हा एकदा अमोल किर्तीकर यांची चौकशी करणार आहे. त्यामुळे आता अमोल किर्तीकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.