बुधवारपर्यंत सर्व रेल्वे मार्ग सुरळीत

बालासोर : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी बालासोर ट्रेन अपघातस्थळी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, बुधवारपर्यंत सर्व रेल्वे मार्ग सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.”

शुक्रवारी सायंकाळी ओडिशातील बालोसरमध्ये तीन ट्रेनची धडक झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत 288 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत. बालासोर रेल्वे दुर्घटना इंटरलॉकिंगमध्ये बदलामुळे झाल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की, बुधवारी सकाळपर्यंत रेल्वे मार्ग पुर्ववत सुरू करण्याचे ध्येय आहे. या दुर्घटनेचं प्रमुख कारण समजलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल घटनास्थळी पाहणी केली होती. आज रेल्वे ट्रॅक दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.