केडीसीसी बँकेच्या आधार इनॅबल पेमेंट सुविधेचा ऊद्या प्रारंभग्राहकांना बायोमेट्रिक पद्धतीने केवळ बोटाच्या ठशाद्वारे मिळणार पैसे           उच्च तंत्रज्ञानात आणखी एक पाऊल पुढे        

 

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ए. ई. पी. एस. म्हणजेच आधार इनॅबल पेमेंट सिस्टीम सुरू करीत आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित या बायोमेट्रिक सुविधेचा प्रारंभ शनिवारी दि. ३० होणार आहे. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या अध्यक्षतेखाली, संचालक मंडळाच्या उपस्थितीत कोल्हापुरात बँकेच्या केंद्र कार्यालयात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

 

 

 

 

 

बायोमेट्रिक तंत्रज्ञानावर आधारित अशी आहे AEPS सुविधा…..!

(Aadhaar Enabled Payment System)

 

• आधार नंबर आधारित डिजिटल बँकिंग सेवा आहे.

 

• ग्राहकांने एकदा बँकेच्या शाखेस भेट देऊन सदर AEPS प्रणाली सुरू करणे बाबत संमती देणे आवश्यक

 

• ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग सेवा सहज उपलब्ध करून देण्यात AEPS महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

 

• फक्त आधार क्रमांक व बायोमेट्रिकच्या साहाय्याने पैसे काढणे, शिल्लक तपासणे व निधी हस्तांतरण करता येते.

 

• जिल्हा बँकेच्या शाखांसह गाव पातळीवर विकास संस्था व दूध संस्था याठिकाणी मायक्रो एटीएमद्वारे बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

 

• बँकेच्या ग्राहकांना बँकेत न जाता जवळच्या विकास किंवा दूध संस्थे द्वारे चालविणेत येणाऱ्या ग्राहक सेवा केंद्रातून बँकिंग व्यवहार करता येणार

 

• ग्राहकास ATM card ची आवश्यकता नाही किंवा कोणताही पिन लक्षात ठेवणे आवश्यक नाही

 

• ग्राहकास फक्त त्याचा आधार क्रमांक आणि बोटाचा ठसा याद्वारे बँकिंग व्यवहार करता येणार

 

• या अत्याधुनिक प्रणालीमुळे आर्थिक समावेशनाला चालना मिळणार आहे.

 

• ज्येष्ठ नागरिक, शेतकरी व ग्रामीण नागरिकांसाठी AEPS सेवा उपयुक्त ठरणार आहे.

 

दरम्यान; बँकेच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या पी. एम. सूर्यघर योजनेविषयी माहिती देण्यासाठी व शंकांचे निरसन करण्यासाठी या कार्यक्रमात महावितरणचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांनी दिली आहे.

=========

🤙 8080365706