स्वाभिमानी शेतकरी संघटने तर्फे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार

कोल्‍हापूर; कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापुर गोकुळ च्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झालेबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी चेअरमन डोंगळे यांना स्वतः कोल्हापुरी फेटा बांधून आपुलकीचा सत्कार केला.

यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ जालिंदर पाटील ,भगवान काटे व इतर मान्यवर होते यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की सामान्य दूध उत्पादकाशी नाळ असणारे नेतृत्व म्हणजे अरुणकुमार डोंगळे असे गौरव उद्गार काढले व त्यांच्या कामाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.