गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणे आयोजकांना महागात

नालासोपारा – प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणे आयोजकांना चांगलेच महागात पडले आहे. परवानगीच्या अटी-शर्तीचा भंग केल्याप्रकरणी आयोजक प्रभाकर पाटील यांच्यावर विरारच्या मांडवी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरारच्या खार्डी गावचे प्रभाकर पाटील यांनी घरच्या सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त गुरुवारी (ता. २५) आपल्या घराच्या समोरील मैदानात गौतमी पाटील हिच्या नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची प्रभाकर पाटील यांनी रितसर परवानगीही घेतली होती. रात्री ७ ते १० वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार होता; मात्र गौतमी पाटील रात्री साडेआठच्या नंतर आल्‍यामुळे कार्यक्रम ९ वाजता सुरू झाला.