नव्या संसदेला घेराव घालण्याची तयारी सुरु

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, 28 मे रोजी संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. पण आता कुस्तीपटूंनी 28 मे रोजी नव्या संसदेला घेराव घालण्याची तयारी सुरु केली आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या पैलवानांनी आंदोलन पुकारले आहे.

28 मे रोजी नव्या संसद भवनाबाहेर आंदोलन करणार असल्याची माहिती कुस्तीपटू साक्षी मलिकने दिली आहे.भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीवर कुस्तीपट्टू ठाम आहेत. महिनाभरापासून कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु आहे. 23 मे रोजी दिल्लीत इंडिया गेटवर कँडल मार्च काढल्यानंतर आता महिला पंचायतच्या तयारीला वेग आलाय. यामध्ये सामील होण्यासाठी पैलवानांनी लोकांना आवाहन केलेय. कुस्तीपट्टूंनी आज पत्रकार परिषद घेत 28 मे रोजी आंदोलन करणार असल्याची माहिती दिली.