भाजप-शिंदे सरकार हे महाविकास आघाडीचा सामना करू शकणार नाही; पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर : काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला 9 प्रश्न विचारत धारेवर धरले. ते आज कोल्हापुरात बोलत होते.

आमची महाविकास आघाडी भक्कमपणे भाजपला तोंड देणार असल्याची ग्वाही चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिली. पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजप-शिंदे सरकार हे महाविकास आघाडीचा सामना करू शकणार नाही. महाविकास आघाडीला भगदाड पडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मात्र, आम्ही भक्कम आहोत भाजप यशस्वी होणार नाही. कुणाला पदावर ठेवायचं हे वरिष्ठ नेत्यांचा निर्णय असतो, त्यामुळे पटोले यांच्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. वरिष्ठांना भेटणं यात काही गैर नाही. कर्नाटकमधील काँग्रेसची परिस्थिती आणि महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. दोन पक्षांशी आघाडी असणं आणि तीन पक्षांशी आघाडी असणं हे वेगळं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बळ मिळालं पाहिजे असं केलं पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.