छ.शाहू नागरी सहकारी पतसंस्थेला लवकरच ऊर्जितअवस्थेत आणणार; राजे समरजितसिंह घाटगे

कागल : सहकारातील आदर्श व्यक्तिमत्व स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे नेहमीम्हणत नागरी किंवा ग्रामीण सहकारी पतसंस्था या ग्रामीण अर्थव्यस्थेचा कणा आहे. ढीगभर संस्था काढण्यापेक्षा मोजक्या संस्था काढा. त्या चांगल्या चालवा, यामध्येच सर्वसामान्य माणसाचे हित दडले आहे. यालाच शाश्वत विकास म्हणतात. विकासाचे तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही छ. शाहू नागरी सहकारी पतसंस्थेचे पुनर्जीवन केले आहे. सर्वसामान्यांच्या या आर्थिक वाहिनीला लवकरच ऊर्जितअवस्था आणून देणार आहोत पतसंस्थेला पुन:र्जीवित करण्याची कागलमधील ही पहिलाच घटना आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

कागल येथे पुनर्जीवित केलेल्या छत्रपती शाहू नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाचा शुभारंभ नवीन जागेत झाला, त्याच्या उद्घाटनवेळी ते बोलत होते. घाटगे पुढे म्हणाले, ही संस्था उर्जीत अवस्थेत आणणे हे मोठे आव्हान आहे.पण ते आम्ही पेलणार आहोत. दुसऱ्याच्या संस्था बळकावून स्वार्थासाठी बंद पाडणाऱ्यांनी एखादी बंद पडलेली पतसंस्था सुरू करून दाखवावी.पतसंस्था उदघाटन शुभारंभ निमित्ताने पहिल्याच दिवशी ठेव ठेवलेल्या ठेवधारकांना घाटगे यांच्या हस्ते ठेव पावतीचे वितरण केले.यावेळी संचालक बाबूराव पाटील,विलास लोहार, सुभाष परीट,विलास डोणे,संजय आतवाडकर,इंदूबाई गाडेकर, इंदुबाई बराले माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी,बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाबगोंडा पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.स्वागत व्हा. चेअरमन बाळासो तिवारी यांनी केले.आभार चेअरमन शिवाजी आवटे यांनी केले.

विरोधकांना कृतीतून उत्तर

आमच्या शाहू दूध संघाच्या विस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. या दूध संघाचे दुसरे युनिटही लवकरच सुरु करत आहोत.तसेच पतसंस्था पुनर्जीवनाचा सहा महिन्यापूर्वी दिलेला शब्दही आज प्रत्यक्षात पूर्ण होत आहे . यापुढे मी विरोधकांना कृतीतूनच उत्तर देणार आहे. असे घाटगे म्हणाले.

News Marathi Content