संजय पवार यांचा कोल्हापुरातील लोकसभेच्या दोन जागेवर दावा

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी  शिवसेना देखील 22 जागांवर दावा करणार असल्याची चर्चा आहे. मविआने सुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी कोल्हापुरातील लोकसभेच्या दोन जागेवर दावा केला आहे.

“महाविकास आघाडी ही शेवटपर्यंत एकत्र लढण्यासाठी केली आहे. हुकूमशाहीच दादागिरीचं, दडपशाहीच सरकार देशभरात आतापर्यंच्या इतिहासात पाहिलं नव्हतं. यांना थांबवलं नाही तर लोकशाही धोक्यात येईल.कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा आतापर्यंत ठाकरे गटाने लढल्या आणि जिंकल्या आहेत.आमचा दावा या दोन्ही जागांवर आहे.या जागेवर शिवसेनेला मतदान झालं आहे.त्यामुळे दोन्ही मतदारसंघ आम्हाला मिळाले पाहिजेत असं आमचा उद्धव ठाकरेंकडे आग्रह असेल”. दरम्यान शिंदे गटाचे नेते 22 जागा लढण्याबाबत गंमत करत असतील, असा टोला संजय पवार यांनी लगावला आहे.