मुंबई : शिंदे गटाला मी पक्ष मानत नाही. हा कोंबड्यांचा खुराडा आहे. त्यामुळे ते फडफड करत आहेत. यांच्या मानेवरून कधीही सुरी फिरवली जाईल, असं सांगतानाच 22 काय शिंदे गटाला पाच जागाही मिळणार नाही, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
ते मीडियाशी बोलत होते. मी शिंदे गटाकडे पक्ष म्हणून पाहत नाही. भाजपने पाळलेलं ते कोंबड्याचं खुराडं आहे. गावात खुराडं असतं, तसं हे खुराडं आहे. या खुराड्यातील कोंबड्या कधीही कापल्या जातील. सकाळ, संध्याकाळ कोंबड्या आरवत असतता. तसे ते आहेत. कॉक कॉक कॉक करत आहेत. तसे करत आहेत. त्यांना काय पक्ष म्हणायचं का? पक्ष म्हणून काय आहे त्यांच्याकडे? त्यांना काही विचारधारा आहे काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला.