दत्पराचे ओझे वाढणार

मुंबई : शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पाठ्यपुस्तकांमध्ये अतिरिक्त कोरी पाने समाविष्ठ करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे दत्पराचे ओझे वाढणार आहे.

असे असले तरी तूर्त हा निर्णय सरकारी शाळांपुरता मर्यादीत आहे. पण हा प्रयोग यशस्वी ठरल्यास हा नियम विनाअनुदानित आणि खासगी शाळांनाही लागू होईल, त्यामुळे पाठ्यपुस्तकांचा खर्च आणि दत्परांचे ओझेही वाढेल.सरकारच्या निर्णयावर शिक्षणतज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली असून, विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना कोरी पाने नसलेली, तर सरकारी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना कोरी पाने असलेली पाठ्यपुस्तके, असा भेदभाव करून शासनाला काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच पुस्तकाचे चार भाग केल्यामुळे विद्यार्थ्यांना आधीच्या पुस्तकातील संदर्भ शोधणे त्रासदायक होईल, अशीही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.