महाराणी येसूबाई यांची साताऱ्यातील माहुली येथे सापडली समाधी

सातारा : छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांची साताऱ्यातील माहुली येथील समाधी सापडली आहे.

येथील हरिनारायण मठाच्या इसवी सन १७५६ मधील ऐतिहासिक कागदपत्रावरून हा शोध लागला आहे.सखोल संशोधनातन यासंदर्भात मूळ दस्तऐवज गुरुवारी साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उघड करण्यात आले यामुळे समाधीचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला गती मिळणार आहेयेसूबाई फाउंडेशन चे संस्थापक सुहास राजेशिर्के आणि जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेचे निलेश पंडित यांच्या उपस्थितीत ही माहिती देण्यात आली .यासंदर्भात बोलताना निलेश पंडित म्हणाले, संगम माहुली गावात एक मोठा दगडी चौथरा आहे या चौथ्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नीचा सगुणाबाई यांचे वृंदावन आणि त्याच्या पाठीमागे सगुणेश्वराचे देवालय आहे . सगुणाबाईंचा मृत्यू २५ जुलै १७४८ रोजी झाला. समाधीच्या पुढील बाजूस कृष्णा वेण्णामाईची रथ शाळा आहे .या रथ शाळेला लागूनच पूर्वाभिमुख अवाढव्य एक दगडी बांधकाम दिसते. हे दगडी बांधकाम म्हणजेच स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांचे समाधी स्थळ आहे . ही समाधी स्थळ वीस फूट उंच आणि दहा फूट रुंद आहे. या इमारतीवर राजघराण्याशी संबंधित अशी राजचिन्हे कोरण्यात आली आहेत .या समाधीचा शोध ज्या इनामपत्राच्या आधारावर घेतला .येथील हरिनारायण मठाच्या दस्तऐवजामध्ये ही माहिती मिळून आली.