मुंबई : माझ्या झालेल्या विजयामुळे भाजपचे डोळे उघडले आहेत. म्हणून भाजप आता जनतेचे कामे करताना दिसत आहेत, असा हल्लाबोल काँग्रेस पक्षाचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
आमदार झाल्यानंतर आणि शपथविधीनंतर त्यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मागील अनेक वर्षापासुन पुणे शहरातील नागरिकांना मिळकत करात सवलत मिळावी, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो. या प्रयत्नांना यश आलं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन त्यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. त्यामध्ये शहरातील मिळकतकरात 40 टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे, असं ते म्हणाले. यासंदर्भात आम्हीदेखील अनेक आंदोलनं केली आहेत. मी आधी देखील सांगितल होत की आशिया खंडात सगळ्यात जास्त टॅक्स घेणारी ही पालिका आहे, असंही ते म्हणाले. आता 500 स्केवर फूट घरांसाठी कर कमी करावा ही मागणी करणार असल्याचं ते म्हणाले.