दूधगंगा पूल,भुयारी मार्गासह कागल-पेठ नाका सहा पदरीकरणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे समरजितसिंह घाटगे यांचा पाठपुरावा

कागल:कागल-पेठ नाका राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले सहापदरीकरण, करनूर-कोगनोळीजवळील भुयारी मार्गाची उंची वाढविणे आणि दूधगंगा नदीवर भरावाऐवजी पिलरचा पूल उभारण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिल्लीत भेट घेऊन निवेदन सादर केले. यावर मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले असल्याची माहिती शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

 

 

करनूर ग्रामपंचायत, स्थानिक शेतकरी व नागरिकांनी या विषयांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती घाटगे यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी हे प्रश्न थेट केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.

 

घाटगे यांनी कागल–पेठ नाका सहापदरीकरणाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्याने ते तातडीने सुरू करून नियोजित उड्डाणपुलांसह पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच करनूर–कोगनोळी मार्गावरील प्रस्तावित भुयारी मार्गाची ४ मीटर उंची ऊस वाहतुकीसह कृषी यंत्रसामग्री, हार्वेस्टर व अवजड वाहनांसाठी अपुरी असल्याने ती वाढविण्याची मागणी केली.

 

दूधगंगा नदीवरील प्रस्तावित भरावाच्या पुलामुळे भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊन करनूर, वंदूर, शंकरवाडी, शेंडूरसह परिसरातील गावांना व शेतजमिनींना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यमगार्णी येथील वेदगंगा नदीप्रमाणे येथेही पिलरचा पूल उभारण्याची मागणी करण्यात आली.

 

राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, कागल,करनूर,वंदूर,कोगनोळीसह सीमा भागातील नागरिक, शेतकऱ्यांच्यादृष्टीने हे तीनही विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत.यावर नितीनजी गडकरी यांनी सकारात्मक भूमिका घेत अधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. ही कामे मार्गी लावाण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे.

 

 

🤙 8080365706