खाल्लेल्या घराचे वासे मोजणारी औलाद म्हणजे भास्कर जाधव; रामदास कदम

रत्नागिरी : चिपळूणच बांडगुळ हे भास्कर जाधव आहे. त्याला मी दोन कवडीची किंमत देत नाही. तो नाच्या आहे. त्याचा मेंदू सडलेला आहे. असा निच माणूस मी अख्या जगात कुठं पाहिला नाही. खाल्लेल्या घराचे वासे मोजणारी औलाद म्हणजे भास्कर जाधव, अशी जहरी टीका मंत्री रामदास कदम यांनी मंत्री आमदार भास्कर जाधव यांच्यावर केली..

ते काय माझा पराभव करणार२०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भास्कर जाधव याला राजकारणातून गाळणार, असंही रामदास कदमरामदास कदम म्हणाले. यावर भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं. रामदास कदम यांना मी २००९ साली पराभूत केलं आहे. ते रामदास कदम ते माझा काय पराभव करणार, असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला.यावर बोलताना रामदास कदम म्हणाले, शरद पवार यांच्या तुकड्यावर कोण जगतंय हे अख्ख्या देशाला माहिती आहे. असा टोलाही रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांनी लगावला. ज्याला कावीळ झाली आहे त्याला जग पिवळं दिसतं. अशी टीका रामदास कदम यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केली.उद्धव ठाकरे खेडमध्ये आले आणि म्हणाले की माझ्या हातात देण्यासारखे काही नाही. मात्र जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा खूप काही कोकणाला देता आलं असतं, याची आठवण रामदास कदम यांनी काढून दिली.