अभियांत्रिकी महाविद्यालयाला मान्यता मिळाल्याने भाजपाचा आनंदोत्स्व

कोल्हापूर : नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने कोल्हापूर येथे ३०० प्रवेश क्षमतेचे नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास काल मंत्रीमंडळाने मान्यता दिली. कोल्हापूर जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांसाठीच्या या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल आज भाजपा कोल्हापूरच्यावतीने पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बिंदू चौक याठिकाणी ढोल ताशांच्या गजरात, साखर – पेढे वाटून नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचे अभिनंदन करून अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला.

याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, आपल्या कामाची प्रसिद्धी न करता समाजउपयोगी कार्य करत राहणे असे नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचे कार्य आहे. जिल्ह्यामध्ये अनेक मंत्री होऊन गेले मोठे बोलून आपले उद्योगच मोठे करायचे असा इतिहास यापूर्वीच्या नेत्यांचा आहे. कोल्हापूर येथे अभियांत्रिकी महाविद्यालय मान्यतेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. आपल्याच जिल्ह्यात दर्जेजार शिक्षण विद्यार्थांना मिळणार आहे. यासारखे अनेक महत्वपूर्ण निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतले जात आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थांसाठी असलेले या महत्वपूर्ण निर्ण्याबाद्द्ल भाजपा कोल्हापूरच्यावतीने एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष आभार मानत असल्याचे नमूद केले.याप्रसंगी बोलतना प्र.का.सदस्य महेश जाधव यांनी, नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या विविध सामाजिक कार्याची माहिती देत जिल्ह्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा हा निर्णय उल्लेखनीय असल्याने नमूद केले.

यावेळी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, हेमंत आराध्ये, विजयसिंह खाडे-पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी सरचिटणीस गणेश देसाई, राजू मोरे, अमोल पालोजी, सचिन तोडकर, विजय आगरवाल, अजित ठाणेकर, रविंद्र मुतगी, गिरीष साळोखे, आशिष कपडेकर, गायत्री राउत, संदीप कुंभार, विशाल शिराळकर, नरेंद पाटील, सचिन सुतार, प्रकाश घाटगे, प्रीतम यादव, सुनीता सूर्यवंशी, छाया ननावरे, प्रसाद पाटोळे, गौरव सातपुते, विवेक वोरा, सुनील पाटील, विश्जीत पोवार, शाहरुख गडवाले, अशोक लोहार, अशोक कोळेकर, रहीम सनदी, रशीद बारगीर, आजम जमादार, दिलीप बोंद्रे, सतीश आंबर्डेकर, संतोष माळी, सुभाष माळी, अभी शिंदे, नरेश जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.